Skip to main content

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज


छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्र चे दैवत . खूप  दिवस झाले मन असे अस्वस्थ झाले होते काही तरी लिहावं बोलावं .प्रत्येक व्यक्ती मध्ये काही तरी  वेगळे पण असते. आपल्या मनातील घुसमट  ,प्रेम  व द्वेष समाज  पुढे आणणे  हे तो आपल्या पद्धतीने व विचाराने प्रयत्न करीत असतो .उदाहरणार्थ कोणी व्यक्ती जर शिवजयंती साजरा करण्या साठी इच्छुक असेल तर त्या व्यक्तीची साजरा करण्याची पद्धत हि त्याच्या विचारावर अवलंबून असते .कोणाला शिवजयंति मध्ये गाड्यांवर भगवा झेंडा लावून मिरवणुकीत फिरायला आवडते तर कोणाला मोठ्याने डॉल्बी चा आवाज करून  नाचण्यात आनंद  वाटत असेल . जर आपण असे म्हणत असू कि अशी लोक फक्त मौज मज्जे  साठी हे  सगळे  करत असती. तरी काही लोकांना हे बोलणे बरोबर वाटत असेल .
परंतु माझ्या मते प्रत्येक व्यक्तीला  त्याचे प्रेम ,निष्ठा  व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे . पण माझ्या मते शिवजयंती साजरी करणे  म्हणजे शिवाजी महाराज्यांच्या विचार आत्त्मसात  करणे . आणि त्या विचारांचा आपल्या जीवनातील प्रत्येक टप्यावर त्याचा उपयोग करून घेणे हा होय . कोणतेही उत्सव हे थाटामाटात करणे हे आपल्या भारतीय लोकांच्या परंपरेचा भाग आहे असे बोलणे काही चुकीचे ठरेल असे वाटत नाही .
आपण आता मूळ मुद्या कडे येऊ . तसे पहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरेच लिखाण झाले आहे .कादंबऱ्या ,नाटके ,गाणी ,पोवाडे .इतिहास ,चरित्रे  इत्यादी वाङ्मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत ,त्या सर्व वाङ्मय प्रकारांत शिवाजी महाराज  आणि शिवकाळ  हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे . पण एवढे सारे होऊनही शिवकाळाचे  ,शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा आहे ,असे म्हणता येणे  योग्य नाही .
कारण कि आज काही माणसे (इतिहासकार )आपल्या सोईनुसार इतिहासाची मांडणी करत आहेत . इतिहास हा पुरवायच्या आधारे लिहिला जातो भावनिक आधारे नाही . परंतु काही इतिहासकार  हे भावनिक आधारे इतिहास लिहून  लोकांच्या भावना भडकण्याहचे काम करीत आहेत. महापुरुषांना जातीमध्ये वाटून त्यांच्या महान अश्या कार्याला  तडे देण्याऱ्या  रोग हा आज काल वाढतच चालला आहे .
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महत्वाची भूमिका बजावली त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ  लावण्याची परंपरा महाराष्ट्रामधे एकोणिसाव्या  शतकात सुरु झाली .लोकहितवादी, म. जोतिबा फुले आणि न्या .म गो रानडे आणि नंतरच्या काळात इतिहासाचार्य राजवाडे आणि रामशास्त्री भागवत यांनी शिवाजी महाराज्यांच्या कार्याची वेगवेगळ्या दुर्ष्टीकोनांतून मीमांसा केली.
परंतु नंतरच्या काळात शिवाजी महाराज्यांच्या नावाचा वापर मोठ्या प्रमाणात समाज्यामध्ये जातीय वैमनस्य निर्माण करण्यासाठी होऊ लागला .शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजे होते ,त्यांनी मुसलमानी सत्तेचा नि:पात केला आणि हिंदू राज्य स्थापन केले ,ते गोब्राह्मणप्रतिपालक होते - अशा प्रकारची मांडणी विसाव्या शतकात लोकप्रिय झाली . ब . मो पुरंदरे , गो .नी. दांडेकर ,रणजित देसाई आणि इतर अनेक लेखकांनी शिवाजी महाराज्यांची हि प्रतिमा जनमानसात चरित्र या ललित लेखनातून रुजवण्याचा प्रयत्न केला .तसेच चित्रपटमाध्यमांतून भालजी पेंढारकर यांनी याप्रकारचे प्रतिमान उभे केले . इतिहासाचीही पुस्तके त्यास अपवाद नव्हती. उदा . इयत्ता चौथीचे शिवाजी महाराजांवरील पुस्तक. 
शिवाजी महाराजांना आपण जातीच्या चौकटीत बंधिस्त केले आहे असे वाटल्या शिवाय आपणास राहवत नाही. आज काल समाज्यामध्ये इतिहासाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न हा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. महापुरुषांना देवी देवतांचा अवतार सांगून त्याच्या कार्याला गालबोट लावण्याचे काम यातून होत आहे. शिवाजी महाराजांवर मनापासून प्रेम करणाऱ्या कितीतरी मोठ्या जनसमुदायांत शिवाजी महाराज हे परमेश्वराचे अवतार आहेत अशी भाबडी श्रद्धा लोकांच्या मनात रुजू होत आहे हे आपणास दिसत आहे.कोणी शिवरायांना शिवाचा अवतार म्हणवतात तर कोणी विष्णुचा.आपल्या देशात आणि परंपरेत माणसाचा देव व्हायला वेळ लागत नाही .ऐतिहासिक थोर पुरुषांचे सोडा .एखाद्या चांगल्या माणसालासुद्धा 'देवमाणूस ' म्हणायची रीत आहे.  
शिवाजी महाराज हे हाडामासाची मनुष्य होते . त्यांच्या मनात रायते बद्द्दल कळवळा होता . त्याच प्रमाणे शिवाजी महाराज हे  थोर, हुशार ,दूरदृष्टीपणा आणि नीतिमान होते. 
शिवाजी महाराज देव आहे अशी समजूत असल्या कारणामुळे वर्षातून एकदा ' शिवाजी महाराज कि जय ' म्हणायचे , जयंती करायची ,वर्गणी गोळा करायची ,थोडी खर्चायची ,थोडी खायची .जमलं तर थोडी खर्चायची अन जास्त खायची .कपाळाला अष्टगंध लावायचा ,गुलाल उधळायचा कि काम झालं . शिवभक्त म्हणून घ्यायला आपण रिकामे झालो . शिवाजीसारखे वागण्याची आपल्यावर जवाबदारी नाही . शिवाजी महाराजांनी रयतेला मदत केली .आणि आता त्यांच्या भोंदू भक्तानी रयतेला मदत केली का ? आता त्यांच्या भोंदू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्याचाच उपयोग करायचा . दारूच्या अड्ड्यावर , मटणाच्या गादीवर , बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर शिवाजी महाराजांचा झेंडा अन  शिवाजींचा फोटो लावायचा अन काळे धंदे चालवायचे . हा शिवाजी महाराजांचा गैरवापर आहे . शिवाजी महाराजांना नीट समजून घेऊन हे सगळे थांबवले पाहिजे. भोंदू कोण आणि भक्त कोण हे समजून घेणे हि काळाची गरज आहे.
इतिहासाचा विपर्यास का केला जातो ? असा प्रश्न अनेकांच्या मनात खुणावत असतो .तर त्याचे सरळ सरळ उत्तर असे आहे कि. अगदी अलीकडच्या काळामध्ये असो किंवा जुन्या काळातील असो , थोर पुरुषांच्या चरित्राचा ,त्यांच्या प्रेरणांचा विपर्यास केला गेला आहे . हे उगाच घडत नाही . त्यात अडाणीपणाचा जसा भाग आहे असतो तसा खोडसाळपणाचा अन आपमतलबीपणाचाही भाग असतो.दोन्हीचा परिणाम मात्र तास एकाच होतो.
वैचारिक पायाखेरीच  बदल होऊ शकत नाही.म्हणून आजच्या रयतेने शिवाजी महाराजांचा   खरा इतिहास शोधला पाहिजे .त्याच्या योग्य अर्थ लावला पाहिजे .इतिहासात टाकाऊ असेल ते टाकले पाहिजे.  
पुढे घेऊन जाण्यायोग्ये जे असेल त्यात नव्या प्रगत विचारांची भर घालून प्राप्त काळाला योग्य अशा रीतीने अभ्य्सातून ते पुढे नेले पाहिजे.शिवाजी महाराजांच्या इतिहासात ,विचारात शिवाजीच्या कार्यच्या प्रेरणेत आजही उपयुक्त ठरू शकेल असे बरेच काही आहे .ते नीट समजून घेतले पाहिजे आणि पुढे नेले पाहिजे .





Comments

  1. That's true.... Very nice... Everyone has right to know our true history.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रेम कोणी कोणावर करावं

प्रेम कोणी कोणावर करावं प्रेम मनातील श्रीमंती वर करावं .।।धृ ।। प्रेमात असलेल्या प्रियसीला प्रेमाची जाणीव करून द्यावं  प्रेमात अडकवून प्रेमाची साक्ष द्यायला भाग पाडाव .।।१।।  चुकलो असेल प्रेमात कदाचित ,तर समजून घ्यावं  प्रेमातील आसवांना शिंपल्यातील  मोत्यां  प्रमाणे जपावं . ।।२।। राग येत असेल कदाचित परंतु माफ करून द्यावं  प्रेमात पडलो म्हणून प्रेमानेच समजवावं.।।३।।  प्रेमाचा अर्थ कदाचित समजला नसेल तुला .  खर सांगू प्रेमा मुळेच जीवनाचा अर्थ समजायला लागलाय मला. ।।४।। By Pushkar Baviskar

शाळेतील प्रेम शाळेतच राहील

शाळेतील प्रेम शाळेतच राहील  शाळा सुटली पण मन शाळेच्या आठवणीत  रुजलं .  पहिले शाळा सुरु झाली कि डोळ्यात अश्रू दाटून यायचे  आता मात्र अश्रुंनीच शाळेचे सुख अनुभवायचे . ।।१।। शाळा भरली कि तिच्या सहवासात रमायचं  शाळा सुटली कि  तिच्या आठवणीत जगायचं . ।।२।। शाळेत विषयाच्या तासाला कंटाळा करायचा .  पण प्रेमाच्या तासात अवर्जून भाग घ्यायचा. ।।३।। नजर चुकवून तिच्या कडे बघायचे.  पण तिला समजताच हृदयाचे ठोके वाढायचे. ।।४।। शाळेत अवघड गणिताच कोड मात्र सुटले .  परंतु हृदय मात्र  तिच्या प्रेमाच्या कोड्यात अडकून पडले . ।।५।। शाळेत असताना हिंमत मात्र कधी झाली नाही .  हवी असलेली नाती शाळेच्या आठवणीत राहून गेली ।।६।। तिला समजण्याच्या आधीच शाळा ही  सुटली .  तिच्या आठवणीने मात्र  हृदयात प्रेमाची शाळा  भरली . ।।७।। समजले असेल कदाचित पण मनातलं सांगायचे राहील  म्हणूनच कदाचित शाळेतील प्रेम शाळेतच राहील . ।।८।।

Management

Management is an essentially human art rather than a science. Management is something to be passionate about and something that needs to be out with passion. Corporate men are only human.