Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

मी म्हणजे कोण असा सवाल मी जगाला करत आहे .

मी म्हणजे कोण असा सवाल मी जगाला करत आहे . ।।धृ ।। मी म्हणजे कोण मातृत्व जपणारी आई  का नाक्या वर उभी राहून देह विकरणारी बाई.।।१।। मी स्त्री चे स्त्रीत्व जपणारी , तुम्ही मात्र घाणेरड्या नजरा चिटकवून स्त्रीत्व साजरा करणारे करंटी  . ।।२।। मी स्त्री म्हणून अपमानित  होते. सायांकळी मात्र जनता  माझ्या नग्न देहाची गुलाम होते .।।३।। मी एक  स्त्री म्हणून कोणाची प्रियसी होते . ती मात्र विकृत समाजाची रखेल बनते .।।४।। मी स्त्रीचे स्त्रीपण रुबाबात मिरवते .  ती मात्र स्त्री पणाला दोष देत पोटाची भूक भागवते.।।५।। मी सोन्या चंदीच्या अलंकाराने देहाला नटवते .  ती मात्र तिचा देह  घाणेरड्या नजरा आणि शिव्यांनी सजवते. ।।६।। मी प्रेम वासनेचे आयुष्य जगते  ती मात्र वासनेच्या आगीत स्वतःच्या शरीराची राख करते ।।७।। मी क्षणभरची  कामुक्ता आवडीने जोपासते .  ती मात्र समाजमान्य बलात्काराला आपलेसे करते ।।८।। शेवटी मी आणि ती एकाच ठरते  म्हणून जगाला ओरडून विचारते ... सांगा मी कोण आहे . 

शाहिरी अभंग गाते ( नितीन चंदनशिवे.)

 छाया नागजकरांच्या तमाशात नाचणारी पुष्पां लोंढे ही एकदा पुण्यात आली आणि आवर्जून मला भेटली.स्वारगेटला आमची भेट झाली तेव्हा पुष्पाने रमेशबद्दल सांगितलं आणि मी हादरून गेलो.रमेश गेल्या सहा महिन्यांपासून झोपून आहे.त्याची बायको त्याला सोडून गेली आहे.तुझी सारखी आठवण काढत असतो.सात आठ पत्रं त्याने तुला लिहली आहेत पण पाठवली नाहीत."रमेश कधी जाईल याचा नेम नाही तू त्याला भेटून यायला हवं".रमेशची आठवण गहरी झाली.डोळ्यात कृष्णा दाटून आली आणि तो काळ जसाच्या तसा आठवला. --------रमेश वाघमारे उर्फ रमेश खलाटीकर.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खलाटी म्हणून शंभर दीडशे उंबऱ्याचं हे गाव हा तिथलाच.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तमाशाचे फड जिंकणारा हा विनोदाचा बादशहा.सोंगाड्या ते शाहीर आणि ढोलकीपटू अशी रमेशची ओळख.छाया माया नागजकर यांच्या तमाशात त्याने काम केलं.मंगला बनसोडे यांच्या तमाशातही तो फार काळ होता.हा रमेश म्हणजे माझ्या आईचा सख्खा मावसभाऊ.याच्या संगतीनेच मी त्याकाळी अनेक जत्रेत तमाशा कलावंतांच्या घोळक्यात फिरलो.आज तमाशावर अनेकजण अभ्यास करत आहेत अनेक शोधनिबंधात रमेश खलाटीकर याचा उल्लेख केला आहे.या

या स्वातंत्र्यचे काय होईल?

या स्वातंत्र्यचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील कि पुन्हा गमावून बसेल ? हा माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो . भारत पूर्वी कधी स्वतंत्र देश नव्हता असे नाही . परंतु येथे असा मुद्दा उपस्थित होतो कि , त्याला एकेवेळी स्वातंत्र्य होते पण तो ते गमावून बसला . तो आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा गमावेल काय?देशाच्या भवितव्याबद्दल मला जास्त चिंताक्रांत करणारा हा प्रश्न आहे.  माझ्या मनाला जास्त टोचणी  जिची लागलेली आहे ती गोष्ट हि की  , भारताने आपले जे स्वातंत्र्य पूर्वी एकदा गमावले ते हिंदुस्थानच्या काही रहिवासांच्या कपटी कारस्थनामुळे ! हे सत्य हृदयाला असह्य वाटू लागते. महंमद बिन कासीम याने सिंधवर जेव्हा स्वारी केली तेव्हा सिंधचा राजा दाहीर यांच्या सेनापतींनी महंमद बिन कासिमच्या हस्तकांनी दिलेल्या लाचा स्वीकारल्या आणि दहार राज्याच्या बाजूने लढण्यास नकार दिला . भारतावर चाल करून येण्याचे आणि पृथ्वीराजाच्या विरुद्ध लढाई करण्याचे आमंत्रण जयचांदणे महंमद घोरीला दिले आणि या कार्यात मी स्वतः व सोळंकी घराण्यातील राजे तुला मदत करू असे जयचंदाने महंमद घोरीला आश्वासन दिले . शिवाजी महाराज हिंदूंच्या स्