मी म्हणजे कोण असा सवाल मी जगाला करत आहे . ।।धृ ।।
मी म्हणजे कोण मातृत्व जपणारी आई
का नाक्या वर उभी राहून देह विकरणारी बाई.।।१।।
मी स्त्री चे स्त्रीत्व जपणारी ,
तुम्ही मात्र घाणेरड्या नजरा चिटकवून स्त्रीत्व साजरा करणारे करंटी . ।।२।।
मी स्त्री म्हणून अपमानित होते.
सायांकळी मात्र जनता माझ्या नग्न देहाची गुलाम होते .।।३।।
मी एक स्त्री म्हणून कोणाची प्रियसी होते .
ती मात्र विकृत समाजाची रखेल बनते .।।४।।
मी स्त्रीचे स्त्रीपण रुबाबात मिरवते .
ती मात्र स्त्री पणाला दोष देत पोटाची भूक भागवते.।।५।।
मी सोन्या चंदीच्या अलंकाराने देहाला नटवते .
ती मात्र तिचा देह घाणेरड्या नजरा आणि शिव्यांनी सजवते. ।।६।।
मी प्रेम वासनेचे आयुष्य जगते
ती मात्र वासनेच्या आगीत स्वतःच्या शरीराची राख करते ।।७।।
मी क्षणभरची कामुक्ता आवडीने जोपासते .
ती मात्र समाजमान्य बलात्काराला आपलेसे करते ।।८।।
शेवटी मी आणि ती एकाच ठरते
म्हणून जगाला ओरडून विचारते ... सांगा मी कोण आहे .
Chan lihiles .... 👍
ReplyDeleteThank you !
DeleteWell written 👍
ReplyDeleteThank You !
DeleteVaicharik
DeleteYes
DeleteMsttt ahe kavita dada...Superb🤗
ReplyDeleteThank you 😊
Delete