शाळेतील प्रेम शाळेतच राहील
शाळा सुटली पण मन शाळेच्या आठवणीत रुजलं .
पहिले शाळा सुरु झाली कि डोळ्यात अश्रू दाटून यायचे
आता मात्र अश्रुंनीच शाळेचे सुख अनुभवायचे . ।।१।।
शाळा भरली कि तिच्या सहवासात रमायचं
शाळा सुटली कि तिच्या आठवणीत जगायचं . ।।२।।
शाळेत विषयाच्या तासाला कंटाळा करायचा .
पण प्रेमाच्या तासात अवर्जून भाग घ्यायचा. ।।३।।
नजर चुकवून तिच्या कडे बघायचे.
पण तिला समजताच हृदयाचे ठोके वाढायचे. ।।४।।
शाळेत अवघड गणिताच कोड मात्र सुटले .
परंतु हृदय मात्र तिच्या प्रेमाच्या कोड्यात अडकून पडले . ।।५।।
शाळेत असताना हिंमत मात्र कधी झाली नाही .
हवी असलेली नाती शाळेच्या आठवणीत राहून गेली ।।६।।
तिला समजण्याच्या आधीच शाळा ही सुटली .
तिच्या आठवणीने मात्र हृदयात प्रेमाची शाळा भरली . ।।७।।
समजले असेल कदाचित पण मनातलं सांगायचे राहील
म्हणूनच कदाचित शाळेतील प्रेम शाळेतच राहील . ।।८।।
It's really nice Pushkar!! You have very good talent....
ReplyDeleteThank You So Much !
DeleteKharach Khup Chan ahe kavita☺☺☺
ReplyDeleteThank you !
Deleteअतिशय सुंदर
ReplyDeleteधन्यवाद
Delete👌👌👌nice
ReplyDeleteThank you !
DeleteThank you !
ReplyDeletenice bro
ReplyDeleteThanks Bro 👍
Delete