Skip to main content

प्रेम कोणी कोणावर करावं

प्रेम कोणी कोणावर करावं
प्रेम मनातील श्रीमंती वर करावं .।।धृ ।।
प्रेमात असलेल्या प्रियसीला प्रेमाची जाणीव करून द्यावं 
प्रेमात अडकवून प्रेमाची साक्ष द्यायला भाग पाडाव .।।१।। 
चुकलो असेल प्रेमात कदाचित ,तर समजून घ्यावं 
प्रेमातील आसवांना शिंपल्यातील  मोत्यां  प्रमाणे जपावं . ।।२।।
राग येत असेल कदाचित परंतु माफ करून द्यावं 
प्रेमात पडलो म्हणून प्रेमानेच समजवावं.।।३।। 
प्रेमाचा अर्थ कदाचित समजला नसेल तुला . 
खर सांगू प्रेमा मुळेच जीवनाचा अर्थ समजायला लागलाय मला. ।।४।।
By Pushkar Baviskar

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शाळेतील प्रेम शाळेतच राहील

शाळेतील प्रेम शाळेतच राहील  शाळा सुटली पण मन शाळेच्या आठवणीत  रुजलं .  पहिले शाळा सुरु झाली कि डोळ्यात अश्रू दाटून यायचे  आता मात्र अश्रुंनीच शाळेचे सुख अनुभवायचे . ।।१।। शाळा भरली कि तिच्या सहवासात रमायचं  शाळा सुटली कि  तिच्या आठवणीत जगायचं . ।।२।। शाळेत विषयाच्या तासाला कंटाळा करायचा .  पण प्रेमाच्या तासात अवर्जून भाग घ्यायचा. ।।३।। नजर चुकवून तिच्या कडे बघायचे.  पण तिला समजताच हृदयाचे ठोके वाढायचे. ।।४।। शाळेत अवघड गणिताच कोड मात्र सुटले .  परंतु हृदय मात्र  तिच्या प्रेमाच्या कोड्यात अडकून पडले . ।।५।। शाळेत असताना हिंमत मात्र कधी झाली नाही .  हवी असलेली नाती शाळेच्या आठवणीत राहून गेली ।।६।। तिला समजण्याच्या आधीच शाळा ही  सुटली .  तिच्या आठवणीने मात्र  हृदयात प्रेमाची शाळा  भरली . ।।७।। समजले असेल कदाचित पण मनातलं सांगायचे राहील  म्हणूनच कदाचित शाळेतील प्रेम शाळेतच राहील . ।।८।।

शाहिरी अभंग गाते ( नितीन चंदनशिवे.)

 छाया नागजकरांच्या तमाशात नाचणारी पुष्पां लोंढे ही एकदा पुण्यात आली आणि आवर्जून मला भेटली.स्वारगेटला आमची भेट झाली तेव्हा पुष्पाने रमेशबद्दल सांगितलं आणि मी हादरून गेलो.रमेश गेल्या सहा महिन्यांपासून झोपून आहे.त्याची बायको त्याला सोडून गेली आहे.तुझी सारखी आठवण काढत असतो.सात आठ पत्रं त्याने तुला लिहली आहेत पण पाठवली नाहीत."रमेश कधी जाईल याचा नेम नाही तू त्याला भेटून यायला हवं".रमेशची आठवण गहरी झाली.डोळ्यात कृष्णा दाटून आली आणि तो काळ जसाच्या तसा आठवला. --------रमेश वाघमारे उर्फ रमेश खलाटीकर.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खलाटी म्हणून शंभर दीडशे उंबऱ्याचं हे गाव हा तिथलाच.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तमाशाचे फड जिंकणारा हा विनोदाचा बादशहा.सोंगाड्या ते शाहीर आणि ढोलकीपटू अशी रमेशची ओळख.छाया माया नागजकर यांच्या तमाशात त्याने काम केलं.मंगला बनसोडे यांच्या तमाशातही तो फार काळ होता.हा रमेश म्हणजे माझ्या आईचा सख्खा मावसभाऊ.याच्या संगतीनेच मी त्याकाळी अनेक जत्रेत तमाशा कलावंतांच्या घोळक्यात फिरलो.आज तमाशावर अनेकजण अभ्यास करत आहेत अनेक शोधनिबंधात रमेश खलाटीकर याचा उल्लेख केला आहे.या...