Always do your best what you plant now you will harvest late...
छाया नागजकरांच्या तमाशात नाचणारी पुष्पां लोंढे ही एकदा पुण्यात आली आणि आवर्जून मला भेटली.स्वारगेटला आमची भेट झाली तेव्हा पुष्पाने रमेशबद्दल सांगितलं आणि मी हादरून गेलो.रमेश गेल्या सहा महिन्यांपासून झोपून आहे.त्याची बायको त्याला सोडून गेली आहे.तुझी सारखी आठवण काढत असतो.सात आठ पत्रं त्याने तुला लिहली आहेत पण पाठवली नाहीत."रमेश कधी जाईल याचा नेम नाही तू त्याला भेटून यायला हवं".रमेशची आठवण गहरी झाली.डोळ्यात कृष्णा दाटून आली आणि तो काळ जसाच्या तसा आठवला. --------रमेश वाघमारे उर्फ रमेश खलाटीकर.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खलाटी म्हणून शंभर दीडशे उंबऱ्याचं हे गाव हा तिथलाच.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तमाशाचे फड जिंकणारा हा विनोदाचा बादशहा.सोंगाड्या ते शाहीर आणि ढोलकीपटू अशी रमेशची ओळख.छाया माया नागजकर यांच्या तमाशात त्याने काम केलं.मंगला बनसोडे यांच्या तमाशातही तो फार काळ होता.हा रमेश म्हणजे माझ्या आईचा सख्खा मावसभाऊ.याच्या संगतीनेच मी त्याकाळी अनेक जत्रेत तमाशा कलावंतांच्या घोळक्यात फिरलो.आज तमाशावर अनेकजण अभ्यास करत आहेत अनेक शोधनिबंधात रमेश खलाटीकर याचा उल्लेख केला आहे.या...
Comments
Post a Comment