Skip to main content

Posts

मी म्हणजे कोण असा सवाल मी जगाला करत आहे .

मी म्हणजे कोण असा सवाल मी जगाला करत आहे . ।।धृ ।। मी म्हणजे कोण मातृत्व जपणारी आई  का नाक्या वर उभी राहून देह विकरणारी बाई.।।१।। मी स्त्री चे स्त्रीत्व जपणारी , तुम्ही मात्र घाणेरड्या नजरा चिटकवून स्त्रीत्व साजरा करणारे करंटी  . ।।२।। मी स्त्री म्हणून अपमानित  होते. सायांकळी मात्र जनता  माझ्या नग्न देहाची गुलाम होते .।।३।। मी एक  स्त्री म्हणून कोणाची प्रियसी होते . ती मात्र विकृत समाजाची रखेल बनते .।।४।। मी स्त्रीचे स्त्रीपण रुबाबात मिरवते .  ती मात्र स्त्री पणाला दोष देत पोटाची भूक भागवते.।।५।। मी सोन्या चंदीच्या अलंकाराने देहाला नटवते .  ती मात्र तिचा देह  घाणेरड्या नजरा आणि शिव्यांनी सजवते. ।।६।। मी प्रेम वासनेचे आयुष्य जगते  ती मात्र वासनेच्या आगीत स्वतःच्या शरीराची राख करते ।।७।। मी क्षणभरची  कामुक्ता आवडीने जोपासते .  ती मात्र समाजमान्य बलात्काराला आपलेसे करते ।।८।। शेवटी मी आणि ती एकाच ठरते  म्हणून जगाला ओरडून विचारते ... सांगा मी कोण आहे .  ...
Recent posts

शाहिरी अभंग गाते ( नितीन चंदनशिवे.)

 छाया नागजकरांच्या तमाशात नाचणारी पुष्पां लोंढे ही एकदा पुण्यात आली आणि आवर्जून मला भेटली.स्वारगेटला आमची भेट झाली तेव्हा पुष्पाने रमेशबद्दल सांगितलं आणि मी हादरून गेलो.रमेश गेल्या सहा महिन्यांपासून झोपून आहे.त्याची बायको त्याला सोडून गेली आहे.तुझी सारखी आठवण काढत असतो.सात आठ पत्रं त्याने तुला लिहली आहेत पण पाठवली नाहीत."रमेश कधी जाईल याचा नेम नाही तू त्याला भेटून यायला हवं".रमेशची आठवण गहरी झाली.डोळ्यात कृष्णा दाटून आली आणि तो काळ जसाच्या तसा आठवला. --------रमेश वाघमारे उर्फ रमेश खलाटीकर.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खलाटी म्हणून शंभर दीडशे उंबऱ्याचं हे गाव हा तिथलाच.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तमाशाचे फड जिंकणारा हा विनोदाचा बादशहा.सोंगाड्या ते शाहीर आणि ढोलकीपटू अशी रमेशची ओळख.छाया माया नागजकर यांच्या तमाशात त्याने काम केलं.मंगला बनसोडे यांच्या तमाशातही तो फार काळ होता.हा रमेश म्हणजे माझ्या आईचा सख्खा मावसभाऊ.याच्या संगतीनेच मी त्याकाळी अनेक जत्रेत तमाशा कलावंतांच्या घोळक्यात फिरलो.आज तमाशावर अनेकजण अभ्यास करत आहेत अनेक शोधनिबंधात रमेश खलाटीकर याचा उल्लेख केला आहे.या...

या स्वातंत्र्यचे काय होईल?

या स्वातंत्र्यचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील कि पुन्हा गमावून बसेल ? हा माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो . भारत पूर्वी कधी स्वतंत्र देश नव्हता असे नाही . परंतु येथे असा मुद्दा उपस्थित होतो कि , त्याला एकेवेळी स्वातंत्र्य होते पण तो ते गमावून बसला . तो आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा गमावेल काय?देशाच्या भवितव्याबद्दल मला जास्त चिंताक्रांत करणारा हा प्रश्न आहे.  माझ्या मनाला जास्त टोचणी  जिची लागलेली आहे ती गोष्ट हि की  , भारताने आपले जे स्वातंत्र्य पूर्वी एकदा गमावले ते हिंदुस्थानच्या काही रहिवासांच्या कपटी कारस्थनामुळे ! हे सत्य हृदयाला असह्य वाटू लागते. महंमद बिन कासीम याने सिंधवर जेव्हा स्वारी केली तेव्हा सिंधचा राजा दाहीर यांच्या सेनापतींनी महंमद बिन कासिमच्या हस्तकांनी दिलेल्या लाचा स्वीकारल्या आणि दहार राज्याच्या बाजूने लढण्यास नकार दिला . भारतावर चाल करून येण्याचे आणि पृथ्वीराजाच्या विरुद्ध लढाई करण्याचे आमंत्रण जयचांदणे महंमद घोरीला दिले आणि या कार्यात मी स्वतः व सोळंकी घराण्यातील राजे तुला मदत करू असे जयचंदाने महंमद घोरीला आश्वासन दिले . शिवाजी म...

शाळेतील प्रेम शाळेतच राहील

शाळेतील प्रेम शाळेतच राहील  शाळा सुटली पण मन शाळेच्या आठवणीत  रुजलं .  पहिले शाळा सुरु झाली कि डोळ्यात अश्रू दाटून यायचे  आता मात्र अश्रुंनीच शाळेचे सुख अनुभवायचे . ।।१।। शाळा भरली कि तिच्या सहवासात रमायचं  शाळा सुटली कि  तिच्या आठवणीत जगायचं . ।।२।। शाळेत विषयाच्या तासाला कंटाळा करायचा .  पण प्रेमाच्या तासात अवर्जून भाग घ्यायचा. ।।३।। नजर चुकवून तिच्या कडे बघायचे.  पण तिला समजताच हृदयाचे ठोके वाढायचे. ।।४।। शाळेत अवघड गणिताच कोड मात्र सुटले .  परंतु हृदय मात्र  तिच्या प्रेमाच्या कोड्यात अडकून पडले . ।।५।। शाळेत असताना हिंमत मात्र कधी झाली नाही .  हवी असलेली नाती शाळेच्या आठवणीत राहून गेली ।।६।। तिला समजण्याच्या आधीच शाळा ही  सुटली .  तिच्या आठवणीने मात्र  हृदयात प्रेमाची शाळा  भरली . ।।७।। समजले असेल कदाचित पण मनातलं सांगायचे राहील  म्हणूनच कदाचित शाळेतील प्रेम शाळेतच राहील . ।।८।।

ON Reading

ON Reading I hear all the time that people are reading less and less these days. Perhaps there is more distraction, more gadgets, our lives are too busy to find a quiet corner and savour a book. Yet, this is a habit that we need to keep alive in ourselves and inculcate in the future generation. Reading is to the mind what a good meal is to the body. It sustains, it nourishes, it helps us think, it helps us grow . I have for years spoken about a few simple thi ngs we can d o in our homes and around us to keep this habit alive. I hope you will agree w ith my suggestion and try to implement some of them.  * Build Home libraries. Gather books in one and twos and slowly build up a collection. Keep this library as a gift for the future generation, filling it with beautiful meaningful books.  * Read with your children. If you are a parent, keep aside some part of the day when you sit with your children and read together. it could be the same b...

प्रेम कोणी कोणावर करावं

प्रेम कोणी कोणावर करावं प्रेम मनातील श्रीमंती वर करावं .।।धृ ।। प्रेमात असलेल्या प्रियसीला प्रेमाची जाणीव करून द्यावं  प्रेमात अडकवून प्रेमाची साक्ष द्यायला भाग पाडाव .।।१।।  चुकलो असेल प्रेमात कदाचित ,तर समजून घ्यावं  प्रेमातील आसवांना शिंपल्यातील  मोत्यां  प्रमाणे जपावं . ।।२।। राग येत असेल कदाचित परंतु माफ करून द्यावं  प्रेमात पडलो म्हणून प्रेमानेच समजवावं.।।३।।  प्रेमाचा अर्थ कदाचित समजला नसेल तुला .  खर सांगू प्रेमा मुळेच जीवनाचा अर्थ समजायला लागलाय मला. ।।४।। By Pushkar Baviskar

लग्नाचा-जोडीदार कसा हवा?

लग्नाचा-जोडीदार कसा हवा? आजच्या तरुण लग्नाळू मुलींचे मनोगत.. आपल्याला ज्या व्यक्तीसोबत उरलेले संपूर्ण आयुष्य काढायचे तो, विचारांनी परिपक्व, उच्चशिक्षित, वेलसेटल तर हवाच, पण मुख्य म्हणजे तो ओपन माईंडेड असावा. म्हणजे त्याने बायकोला इथेच का गेलीस? त्याच्याशी हसलीच का? अमक्‍याशी का बोलली? मला न विचारता असे का केले? असली फालतू कटकट करायला नको. अर्थात तो पत्नीवर दृढ विश्‍वास ठेवणारा असावा. ही आहे आधुनिक युगात वावरणाऱ्या मुलींची भावी नवऱ्याबद्दलची संकल्पना... खरं तर, मुलीच्या लग्नाचा विषय आला की, आई-वडील वरसंशोधनाच्या कामात व्यस्त होतात. ते इतके व्यग्र होऊन जातात की, स्थळ त्यांना पटलं रे पटलं की मुलीच्या भावभावनांचा विचार न करताच त्यांच्या कल्पनेनुसार चांगलं वाटणारं स्थळ ते नक्की करतात. हे करताना आई-वडिलांना केवळ आर्थिक आणि बाह्य स्थितीची कल्पना असते. अर्थातच मुलाचा स्वभाव, आचरण या बाबींचा विचारही कधी केला जात नाही आणि त्यांच्या लेखी या बाबीला तसे महत्त्वही दिले जात नाही. पण आजच्या महाविद्यालयीन तरुणी आपल्या भावी पतीबद्दल ज्या अपेक्षा बाळगून आहेत, नवऱ्याबाबत त्यांच्या ज्या संकल्पना आहेत...