Skip to main content

शाळेतील प्रेम शाळेतच राहील

शाळेतील प्रेम शाळेतच राहील 
शाळा सुटली पण मन शाळेच्या आठवणीत  रुजलं . 
पहिले शाळा सुरु झाली कि डोळ्यात अश्रू दाटून यायचे 
आता मात्र अश्रुंनीच शाळेचे सुख अनुभवायचे . ।।१।।
शाळा भरली कि तिच्या सहवासात रमायचं 
शाळा सुटली कि  तिच्या आठवणीत जगायचं . ।।२।।
शाळेत विषयाच्या तासाला कंटाळा करायचा . 
पण प्रेमाच्या तासात अवर्जून भाग घ्यायचा. ।।३।।
नजर चुकवून तिच्या कडे बघायचे. 
पण तिला समजताच हृदयाचे ठोके वाढायचे. ।।४।।
शाळेत अवघड गणिताच कोड मात्र सुटले . 
परंतु हृदय मात्र  तिच्या प्रेमाच्या कोड्यात अडकून पडले . ।।५।।
शाळेत असताना हिंमत मात्र कधी झाली नाही . 
हवी असलेली नाती शाळेच्या आठवणीत राहून गेली ।।६।।
तिला समजण्याच्या आधीच शाळा ही  सुटली . 
तिच्या आठवणीने मात्र  हृदयात प्रेमाची शाळा  भरली . ।।७।।
समजले असेल कदाचित पण मनातलं सांगायचे राहील 
म्हणूनच कदाचित शाळेतील प्रेम शाळेतच राहील . ।।८।।

Comments

Post a Comment