"एक सुंदर विचार"
असा कसा तुमचा देव जो बोकडाला लालची आहे पण त्याच्या बरोबर गाडगे बाबांचे फार छान उद्धरण आहे.गाडगे बाबा तीस वर्ष पंढरीच्या वारीला आषाडी आणि कार्तिकी ला गेले पण एकदाही देवळात गेले नाही.एकदाही आषाडी आणि कार्तिकीचा उपवास केला नाही.लोकांनी खराब केलेला चंद्रभागेच्या किनारा स्वतःच्या झाडू ने ते साफ करायचे संध्याकाळी कीर्तनाला उभे राहायचे समोर हजारो माणसे असाची आणि बाबा त्यांना विचारायचे देव पहिला का देव ?....लोकांना वाटायचे ..त्या वेळी बाबांचे एवढे नाव झालेले नव्हते अरे हा माणूस ..आम्ही पांढरीच्या पांडुरंगाला भेटायला आलोय आणि आम्हाला विचारतो देव पहिला का देव ?...लोक म्हणायचे पहिला जी .बाबा म्हणायचे कमाल आहे तुम्ही देव पहिला तुमचा देव कोठे राहतो ?...लोकांना वाटायचे याला काहीच माहिती नाही लोक म्हणायचे आमचा देव देवळात राहतो, तो रंगाने सावळा आहे ,तो विटे उभा आहे ,त्याचे कटीवर हात आहेत, त्याच्या बाजूला रखुमाई आहे .बाबा म्हणायचे कमाल आहे तुमचा देव देवळात राहतो .माझा देव माज्या मनात राहतो तरी लोकांना काही कळायचे नाही मग आपल्या मिश्किल वराडी शैलीत बाबा असे म्हणायचे " तुम्हाले देवाले अंगोळ करते कि नाही लोक म्हणायचे करते तर बाबा म्हणायचे तूम्हाले देवाले अंगोळ कोण घालते ?..लोक म्हणायचे आम्हीच घालतो जी ..मग बाबा म्हणायचे अरे जे तुमचे देवाले स्वतःचे अंगोळ स्वताले करता येत नाही तो तुम्हाला तुमच्या भाग्याची अंगोळ काय घालणार .मग बाबा विचारायचे तुम्हाले देवाले धोतर नेसते कि नाही ?लोक म्हणायचे नेसते तर बाबा म्हणायचे तुम्हाले देवाले धोतर कोण नेसवते ?लोक म्हणायचे आम्हीच नेसवतोजी बाबा म्हणायचे जे तुमचे देवाले स्वतःचे नेसूचे धोतर स्वताले नेसता येत नाही ती तुम्हाले भाग्याचे वस्तरे काय देणार पुढे बाबा विचारायचे.
तुम्हाले देवाले नेवेद्य दाखवते कि नाही ?..लोक म्हणायचे दाखवते बाबा म्हणायचे नेवेद्य दाखवून काय करते? ..लोक म्हणायचे नेवेद्य च्या बाजूला काठी घेऊन बसते बाबा विचायचे कशाला? लोक म्हणायचे देवाले वाढलेले नेवेद्य कावळा कुत्रा खायला आला तर त्याला काठी ने हाकायला बाबा म्हणायचे जे तुमचे देवाले तेच्या साठी वाढलेले नेवेद्य चे स्वतःचे स्वताले रक्षण करता येत नाही तो तुमच्या आयुष्याचे रक्षण रे काय करणार .पुढे बाबा एक लाख मोलाचा प्रश्न विचारायचे "जिता जागता देव कोणी पहिला का जिता जागता देव ?आणि मग कावराबावरा होऊन लोक इकडे तिकडे पाहायला लागायचे कारण तो आपण पाहिलेला नसतो .गाडगे बाबा च्या बाजूला एक माणूस उभा असायचा रापलेला चेहरा जडे भरडे खादीचे कपडे पांढरी शुभ्र दाडी पाय अनवाणी त्याच्या कडे बोट दाखवत बाबा म्हणायचे अरे हे भाऊराव पाटील बघा हे महारा मांगाच्या पोरांना शिकवण्याचे काम करते त्याले देव म्हणा.
अरे अडाण्या ला शिक्षण द्यावे, बेघराला घर द्यावे ,रंजल्या गांजल्याची सेवा करावी ,मुक्या प्राण्यावर दया करावी .बापहो देव याच्यात राहतो बापहो देव देवळात राहत नाही देव आपल्या मनात राहते देवळात मात्र पुजारायचे पोट राहते.
by DR Narendra dabholkar
Comments
Post a Comment