या स्वातंत्र्यचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील कि पुन्हा गमावून बसेल ? हा माझ्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो . भारत पूर्वी कधी स्वतंत्र देश नव्हता असे नाही . परंतु येथे असा मुद्दा उपस्थित होतो कि , त्याला एकेवेळी स्वातंत्र्य होते पण तो ते गमावून बसला . तो आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा गमावेल काय?देशाच्या भवितव्याबद्दल मला जास्त चिंताक्रांत करणारा हा प्रश्न आहे. माझ्या मनाला जास्त टोचणी जिची लागलेली आहे ती गोष्ट हि की , भारताने आपले जे स्वातंत्र्य पूर्वी एकदा गमावले ते हिंदुस्थानच्या काही रहिवासांच्या कपटी कारस्थनामुळे ! हे सत्य हृदयाला असह्य वाटू लागते. महंमद बिन कासीम याने सिंधवर जेव्हा स्वारी केली तेव्हा सिंधचा राजा दाहीर यांच्या सेनापतींनी महंमद बिन कासिमच्या हस्तकांनी दिलेल्या लाचा स्वीकारल्या आणि दहार राज्याच्या बाजूने लढण्यास नकार दिला . भारतावर चाल करून येण्याचे आणि पृथ्वीराजाच्या विरुद्ध लढाई करण्याचे आमंत्रण जयचांदणे महंमद घोरीला दिले आणि या कार्यात मी स्वतः व सोळंकी घराण्यातील राजे तुला मदत करू असे जयचंदाने महंमद घोरीला आश्वासन दिले . शिवाजी म...
Keep it up
ReplyDelete