प्रेम एक भावना
प्रेम म्हणजे अगदी दोन अक्षरांनी बनलेला शब्द्ध बोलता बोलता आपण सहज पणे बोलून जातो कि माझे तुझ्या वर प्रेम आहे .खरंच इतके सोपे असते का कोणावर प्रेम करणे ? अर्थात नाही , प्रेम दिसायला जरी सोपे वाटत असेल ,पण तितके ते सोपे
नाही. कोणाच्या प्रेमात पडणे सोपे असते पण प्रेम शेवट पर्यन्त टिकवून ठेवणे
खूप कठीण . प्रेमात पडले कि त्यात चढ उतार तर येतच असता पण अशा चड उताराला आपण कसे सामोरे जातो हे खूप महत्वाचे असते.माझ्या मते प्रेमात पडणे आणि प्रेमात जगणे या सारखी सूंदर गोष्ट या जगात नाही.पण आजकालच्या जगात प्रेमाला दूषण देणे हा भाग त्याला भेटलेल्या प्रेमातील अनुभवावर अवलंबून असतो .प्रेम हे आपल्या जीवनातील अविभाज्य असा घटक आहे .ज्या व्यक्ती च्या जीवनात प्रेम
हि भावनाच नाही अशा व्यक्तीचे जीवन हे निर्थक आहे असे वाटल्या वाचून राहवत नाही .
लोक प्रेम करतात म्हणून
आपण हि करून बगाव या सारखा अंधविश्वास आपण ऊराशी बाळगून असतो . प्रेम करावं तर अगदी मनभरून आणि म्हणायला गेले तर निरस्वार्थि पणाने करावे . प्रेमात स्वतःचा स्वार्थ जर आपण साधत असू तर अशा प्रेमाला काडीचा हि अर्थ उरात नाही . प्रेमात एकमेकांना समजून घेणे हे खूप महत्वाचे असते . मुळातच एकमेकांना समजून घेणे हे खूप अडचणीचे काम वाटते . प्रेमात पडल्यावर आपण संभाषणावर किती भर देतो हे खूप महत्वाचे असते कारण याची मदत आपल्याला एकमेकांना चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी होत असते . आपल्या जीवनात
असे अनेक टप्पे येतात
कि आपण प्रेमात पडतो
वा प्रेमात पडावशी वाटते . जसे शाळेत असताना शाळेतील पहिले प्रेम .पहिले प्रेम हे पहिले प्रेम असते अगदी निस्वार्थी आणि निरागस .पहिले प्रेम टिकवून ठेवणे आणि ते सत्यात उतरवणे खूप कठीण असते .पहिल्या प्रेमाची व्याख्या करायला गेले तर एकादी सोपे पण निभवायचे म्हटले तर अगदी कठीण . प्रेम हे अत्तराच्या सुगंधा सारखे
असते जो पर्यंत आपण त्याच्या सहवासात येत नाही तो पर्यंत त्याच्या सुवासाचे अनुभव आपणास येत नाही .तिच्या वर प्रेम करण आणि तिच्या प्रेमाच्या सहवासात राहणे हे क्षण आपल्या जीवनातील मूल्यवान अशा आठवणी मध्ये कायमचे साठवून राहते .माझ्या मते प्रेमात आठवणी जरून निर्माण कराव्यात ,कारण आठवणी मध्ये प्रेमाला बळकट करण्याची ताकद असते.ती नसताना तिच्या आठवणींच्या समुद्रात आपण शांत आपल्या पुढच्या जीवनाची सफर अगदी आनंदमय अशा वातावरणात घडून अनु शकतो. तिच्या प्रमाच्या सहवासात असताना टिपलेले ते आनंदमय क्षण शेवट परियंत आठवणीत राहतात. आपण आंनदा मध्ये
क्षणाच्या शोधात
असतो , पण क्षणांन मध्ये आनंद शोधन हे आपण विसरून गेलेलो असतो.
जनमाणसा मध्ये
प्रेमाचे वर्गीकरण हे वेग वेगळ्या माध्यमातून
होत असते. आई चे आपल्या मुलं वर असलेले प्रेम ,एकाद्या वस्तू किंवा आपल्या जीवनात जे कोणी आदर्श व्यक्ती यांच्या बद्दल असलेले प्रेम. पण यात प्रत्येक गोष्टी मध्ये त्यातील प्रेमभाव हा वेगवेगळा असतो हे लक्षात येण्या वाचून राहत नाही.निस्वार्थी भावनेतून केलेले प्रेम आणि स्वार्थी भावनेतून केलेले प्रेम या मध्ये खूप फरक आहे. निस्वार्थी प्रेमामध्ये तिच्या कडून किंवा त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे नियम हे लादलेले नसतात, परंतु स्वार्थी भावनेतून केलेले प्रेम या उलट असते . त्या मध्ये नियमांचा भडीमार असतो. उदाहणार्थ "
तुझे आचरण हे माझ्या सोयी नुसार असायला पाहिजे ".खरचं प्रेम म्हणजे काय असतं ? तिच्या डोळ्यांतील अश्रू जेव्हा आपल्या डोळ्यांतून ओंगळतात ते प्रेम असतं. तुमच्या चेहऱ्यावरील हसू जेव्हा तिच्या गालावरील खळीतून खुलतं ते प्रेम असतं .जेव्हा तिच्या आठवणीच तुमचा श्वास बनतातं ते प्रेम असतं ,जेव्हा तिच्या येण्याची हलकीशी चाहूल तुमच्या हृदयाची स्पंदनं वाढवते ते प्रेम असतं.तिच्या काजळ डोळ्यांतील काळजी नकळत सांगून जाते कि या जगात आपलं हक्काचं कोणीतरी आहे ते प्रेम असतं. जेथे शब्दांची गरज नसतेच कधी एक ओझरता स्पर्शही खूप काही सांगून जातो न बोलताच भावना व्यक्त होतात ते प्रेम असतं. विरहाचा प्रत्येक क्षण जेथे युगांसमान भासतो ते प्रेम असते. चांदण्या रात्रीतील रश्मी स्वप्नं दोघांच्या पण डोळ्यांत जन्म घेतातं काही हळुवार क्षणांना दोघंही जीवापाड जपतात ते प्रेम असतं . जेथे असतात तिच्या नजरांचे तीक्ष्ण बाण अन त्याचं अचूक लक्ष्य असतात तुम्ही हेच तर खरे प्रेम असते.
Wow how wonderful your thoughts Pushkar !!!!
ReplyDelete