मी म्हणजे कोण असा सवाल मी जगाला करत आहे . ।।धृ ।। मी म्हणजे कोण मातृत्व जपणारी आई का नाक्या वर उभी राहून देह विकरणारी बाई.।।१।। मी स्त्री चे स्त्रीत्व जपणारी , तुम्ही मात्र घाणेरड्या नजरा चिटकवून स्त्रीत्व साजरा करणारे करंटी . ।।२।। मी स्त्री म्हणून अपमानित होते. सायांकळी मात्र जनता माझ्या नग्न देहाची गुलाम होते .।।३।। मी एक स्त्री म्हणून कोणाची प्रियसी होते . ती मात्र विकृत समाजाची रखेल बनते .।।४।। मी स्त्रीचे स्त्रीपण रुबाबात मिरवते . ती मात्र स्त्री पणाला दोष देत पोटाची भूक भागवते.।।५।। मी सोन्या चंदीच्या अलंकाराने देहाला नटवते . ती मात्र तिचा देह घाणेरड्या नजरा आणि शिव्यांनी सजवते. ।।६।। मी प्रेम वासनेचे आयुष्य जगते ती मात्र वासनेच्या आगीत स्वतःच्या शरीराची राख करते ।।७।। मी क्षणभरची कामुक्ता आवडीने जोपासते . ती मात्र समाजमान्य बलात्काराला आपलेसे करते ।।८।। शेवटी मी आणि ती एकाच ठरते म्हणून जगाला ओरडून विचारते ... सांगा मी कोण आहे . ...
Computer science expert and Technology evangelist. Love to programming , and always desire to learn something useful .