शाळेतील प्रेम शाळेतच राहील शाळा सुटली पण मन शाळेच्या आठवणीत रुजलं . पहिले शाळा सुरु झाली कि डोळ्यात अश्रू दाटून यायचे आता मात्र अश्रुंनीच शाळेचे सुख अनुभवायचे . ।।१।। शाळा भरली कि तिच्या सहवासात रमायचं शाळा सुटली कि तिच्या आठवणीत जगायचं . ।।२।। शाळेत विषयाच्या तासाला कंटाळा करायचा . पण प्रेमाच्या तासात अवर्जून भाग घ्यायचा. ।।३।। नजर चुकवून तिच्या कडे बघायचे. पण तिला समजताच हृदयाचे ठोके वाढायचे. ।।४।। शाळेत अवघड गणिताच कोड मात्र सुटले . परंतु हृदय मात्र तिच्या प्रेमाच्या कोड्यात अडकून पडले . ।।५।। शाळेत असताना हिंमत मात्र कधी झाली नाही . हवी असलेली नाती शाळेच्या आठवणीत राहून गेली ।।६।। तिला समजण्याच्या आधीच शाळा ही सुटली . तिच्या आठवणीने मात्र हृदयात प्रेमाची शाळा भरली . ।।७।। समजले असेल कदाचित पण मनातलं सांगायचे राहील म्हणूनच कदाचित शाळेतील प्रेम शाळेतच राहील . ।।८।।
Computer science expert and Technology evangelist. Love to programming , and always desire to learn something useful .