Skip to main content

Posts

Showing posts from January, 2019

लग्नाचा-जोडीदार कसा हवा?

लग्नाचा-जोडीदार कसा हवा? आजच्या तरुण लग्नाळू मुलींचे मनोगत.. आपल्याला ज्या व्यक्तीसोबत उरलेले संपूर्ण आयुष्य काढायचे तो, विचारांनी परिपक्व, उच्चशिक्षित, वेलसेटल तर हवाच, पण मुख्य म्हणजे तो ओपन माईंडेड असावा. म्हणजे त्याने बायकोला इथेच का गेलीस? त्याच्याशी हसलीच का? अमक्‍याशी का बोलली? मला न विचारता असे का केले? असली फालतू कटकट करायला नको. अर्थात तो पत्नीवर दृढ विश्‍वास ठेवणारा असावा. ही आहे आधुनिक युगात वावरणाऱ्या मुलींची भावी नवऱ्याबद्दलची संकल्पना... खरं तर, मुलीच्या लग्नाचा विषय आला की, आई-वडील वरसंशोधनाच्या कामात व्यस्त होतात. ते इतके व्यग्र होऊन जातात की, स्थळ त्यांना पटलं रे पटलं की मुलीच्या भावभावनांचा विचार न करताच त्यांच्या कल्पनेनुसार चांगलं वाटणारं स्थळ ते नक्की करतात. हे करताना आई-वडिलांना केवळ आर्थिक आणि बाह्य स्थितीची कल्पना असते. अर्थातच मुलाचा स्वभाव, आचरण या बाबींचा विचारही कधी केला जात नाही आणि त्यांच्या लेखी या बाबीला तसे महत्त्वही दिले जात नाही. पण आजच्या महाविद्यालयीन तरुणी आपल्या भावी पतीबद्दल ज्या अपेक्षा बाळगून आहेत, नवऱ्याबाबत त्यांच्या ज्या संकल्पना आहेत...